राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले जात आहेत. अशात राज्यपालांनी केलेल्या विधानावरुन खासदार उदयनराजे चांगलेच संतापले आहेत. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी थेट इशारा दिलाय. शिवाय यावेळी महाराजांबद्दल बोलताना ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.